सचिन पिळगांवकर यांची नवीन गाडी तुम्ही पाहिली का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 16:37 IST2017-12-04T11:07:53+5:302017-12-04T16:37:53+5:30
सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच नवीन गाडी घेतली असून या गाडीचे फोटो facebook या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना अनेक लाइक्स मिळत आहेत.
.jpg)
सचिन पिळगांवकर यांची नवीन गाडी तुम्ही पाहिली का?
स िन पिळगांवकर यांनी आज मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनय क्षमतेमुळे आज प्रसिद्धी, पैसा सगळे काही कमावले आहे. आज त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये आता आणखी एका गाडीची भर पडली आहे. ही नवीन गाडी म्हणजे अतिशय सुंदर जीप असून सचिन पिळगांवकर यांनी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर या जीपचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून त्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. सचिन पिळगांवकर यांनी यासोबतच एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन पिळगांवकर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या जीपवर असलेले कव्हर बाजूला करत ही जीप त्यांच्या फॅन्सना दाखवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या त्यांच्या व्हिडिओला आतापर्यंत ६३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
![sachin pilgaonkar new car]()
सचिन पिळगांवकर यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी हा माझा मार्ग एकला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. आज त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सत्ते पे सत्ता, नदियाँ के पार, अखियों के झरोको से, बालिका वधू यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका तर चांगल्याच गाजल्या होत्या. ते केवळ एक चांगले अभिनेते नाहीत तर चांगले दिग्दर्शक, निर्माते, लेखक देखील आहेत.
नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी यांसारखे उत्कृष्ट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अशी ही आशिकी या चित्रपटावर सध्या ते काम करत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ते करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
Also Read : सचिन पिळगांवकरांना या कलाकारामध्ये दिसते त्यांचे बालपण