मृण्मयीचा नवा लूक तु्म्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 20:30 IST2019-03-26T20:30:00+5:302019-03-26T20:30:00+5:30

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.

Did you see Mrunmayee Deshpande new look ? | मृण्मयीचा नवा लूक तु्म्ही पाहिलात का ?

मृण्मयीचा नवा लूक तु्म्ही पाहिलात का ?

ठळक मुद्दे यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहेतिचा हा नवा लूक चाहत्यांना निश्चितच घायाळ करणारा आहे

कट्यार काळजात घुसली' , नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी  अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. सध्या मृण्मयीचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या  मृण्मयीचा हा नवा लूक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी मृण्मयी मात्र या नव्या हेअरकटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. 


तिचा हा नवा लूक चाहत्यांना निश्चितच घायाळ करणारा आहे. मृण्मयीने नेहमीच आपल्या सालस सौंदर्यानं आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळया भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? हे येत्या काळातच प्रेक्षकांना कळेल. तोपर्यंत मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल, हे नक्की! 


सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच  फॅन्सच्या संपर्कात असते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

Web Title: Did you see Mrunmayee Deshpande new look ?