अंकुश आणि दीपा चौधरीच्या मुलाला पाहिलंत का?, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने शेअर केली लेकासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:17 IST2022-12-26T18:17:01+5:302022-12-26T18:17:26+5:30

Ankush Chaudhary And Deepa Chaudhary : अंकुश आणि दीपा चौधरीच्या लेकाचं नाव प्रिन्स असून आज त्याचा वाढदिवस आहे.

Did you see Ankush and Deepa Chaudhary's son?, the actress shared a special post for the daughter on the occasion of her birthday | अंकुश आणि दीपा चौधरीच्या मुलाला पाहिलंत का?, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने शेअर केली लेकासाठी खास पोस्ट

अंकुश आणि दीपा चौधरीच्या मुलाला पाहिलंत का?, वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने शेअर केली लेकासाठी खास पोस्ट

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhary)ची पत्नी दीपा चौधरी(Deepa Chaudhary)ने बऱ्याच मोठा कालावधीनंतर छोट्या पडद्यावरुन कमबॅक केले आहे. ती सध्या झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेली अश्विनी नामक गृहिणी प्रेक्षकांना खूप भावते आहे. तिने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

दीपा चौधरीने मुलगा प्रिंससोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, पाहता पाहता ९ वर्ष सरली. दोन हातांच्या घडीत मावणारं इवलूस बाळ मला ‘तू चाल पुढं’ म्हणण्याइतपत कधी इतकं मोठ झालं कळलच नाही. प्रिंस, तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो आणि त्याचा सुगंध तुझ्या संपूर्ण जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना ! Happiest Birthday My Love 


केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला.

अंकुशने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट देत तो सुपरस्टार बनला. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.

Web Title: Did you see Ankush and Deepa Chaudhary's son?, the actress shared a special post for the daughter on the occasion of her birthday