सईला मिठी मारणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का?; दोघींनीही केलं होतं एकाच सिनेमात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 15:47 IST2023-12-22T15:46:35+5:302023-12-22T15:47:05+5:30
Sai tamhankar: सईने या अभिनेत्रीसोबत फोटो पोस्ट करत ती कोण आहे हे ओळखा, असं चॅलेंज चाहत्यांना दिलं होतं.

सईला मिठी मारणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का?; दोघींनीही केलं होतं एकाच सिनेमात काम
मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (sai tamhankar). काही दिवसांपूर्वीच सई मुंबईकर झाली आहे. नुकतंच तिने तिच्या स्वप्नांचं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे या घरातील अनेक फोटो, व्हिडीओ तिने नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहेत. यामध्येच आता तिने एका अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करुन तिने फोटोमधील अभिनेत्री कोण हे नेटकऱ्यांना ओळखायला सांगितलं होतं.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिला मिठी मारली होती. त्यामुळे या अभिनेत्रीचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळेच ही मुलगी कोण ओळखून दाखवा असं चॅलेंज सईने नेटकऱ्यांना दिलं होतं. त्यावर नेटकऱ्यांनीही अनेक रिप्लाय दिले होते.
नेमकी कोण आहे ही अभिनेत्री?
सईने ही पोस्ट शेअर केल्यानंतर पुन्हा एक नवीन पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने तिच्यासोबत असलेली तरुणी कोण आहे हे सांगितलं. सईसोबत दिसत असलेली ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) आहे.
दरम्यान, अलिकडेच सोनाली आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सईच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. या भेटीदरम्यान या दोघींनी हा फोटो शेअर केला होता. सई, सोनाली आणि आदित्य सरपोतदार यांनी क्लासमेट या सिनेमात एकत्र काम केलं होतं.