नागराज मंजुळे यांचं या अभिनेत्रीवर होते क्रश, म्हणाले- मी तिचे फोटो....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:02 IST2023-04-07T15:40:19+5:302023-04-07T16:02:16+5:30

नागराज यांच्या सिनेमाविषयी, त्यांच्या टीमविषयी तर सर्वांना माहिती आहेच. पण त्यांच्या खासगी आयुष्याविषयी फारसे कुणाला काही माहिती नाही,

Did you know Nagraj Manjule had a crush on this actress | नागराज मंजुळे यांचं या अभिनेत्रीवर होते क्रश, म्हणाले- मी तिचे फोटो....

नागराज मंजुळे यांचं या अभिनेत्रीवर होते क्रश, म्हणाले- मी तिचे फोटो....

 नागराज मंजुळेंचा 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा उद्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्यासोबत नागराज या सिनेमात धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहेत. या सिनेमात नागराज अण्णा एका तडफदार पोलिस ऑफीसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नागराज अण्णांना पाहायला चाहते भलतेच उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार हवा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने लोकमत फिल्मीशी देखील नागराज मंजुळे यांनी संवाद साधला. 

नागराज मंजुळे असा दिग्दर्शक ज्यांच्या सिनेमाची लोक आतुरतेने वाट पाहतात. सोलापूरमधील करमाळा या छोट्या गावीच ते लहानाचे मोठे झाले. मात्र त्यांचं टॅलेंट त्यांना इथपर्यंत घेऊन आलं. नागराज यांच्या सिनेमाविषयी, त्यांच्या टीमविषयी तर सर्वांना माहिती आहेच. पहिल्यांदाच त्यांनी आपल्या आवडी-निवडीबाबत खुलासा केला. यावेळी बोलताना नागराज म्हणाले मला श्री देवी खूप आवडायच्या. त्यांचे फोटो देखील जमा करुन ठेवायचो. आता मात्र कोणतीच अभिनेत्री आपल्याला आवडत नसून सगळचं क्रॅश झालंय.

'घर बंदुक बिरयानी' हा सिनेमा आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. सिनेमात स्वत: नागराज मंजुळे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि अभिनेत्री सायली पाटील तसंच अभिनेते सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडले असून आता चित्रपटाची उत्सुकता आहे.

Web Title: Did you know Nagraj Manjule had a crush on this actress