Fathers Day : पर्ण पेठेचे वडील देखील आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:00 AM2022-06-19T07:00:00+5:302022-06-19T07:00:05+5:30

पर्णने मराठी सिनेसृष्टी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पदार्पण केलं. नुकताच तिचा 'मीडियम स्पायसी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Did you know Actress Parna Pethe's father is also a famous face in the Marathi industry | Fathers Day : पर्ण पेठेचे वडील देखील आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, जाणून घ्या याविषयी

Fathers Day : पर्ण पेठेचे वडील देखील आहेत मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा, जाणून घ्या याविषयी

googlenewsNext

सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री पर्ण पेठेविषयी सांगणार आहोत.

मराठी सिनेसृष्टी अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये स्टार किड्स म्हणून पदार्पण केलं. अभिनेत्री पर्ण पेठेही त्यापैकी एक आहे. पर्ण लेखक दिग्दर्शक अतुल पेठे यांची कन्या आहे. त्यामुळेच अभिनयाचं बाळकडू पर्णला घरातूनच मिळालं. पर्ण पेठे आणि लेखक दिग्दर्शक अतुल पेठे सध्या अडलंय का?..या नाटकात एकत्र काम केलंय. या नाटकातील या दोघांच्या अभिनयाचे कौतुक देखील झालं. निपुण धर्माधिकारी याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. नाट्यप्रेमीकडून या बाप लेकीच्या जोडीला चांगला प्रतिसाद दिला होता..


पर्ण पेठेने मराठी सिनेमातून रसिकांची मनं जिंकली आहेत. 'विहीर', 'रमा माधव', 'वायझेड', 'फोटोकॉपी' अशा विविध सिनेमात विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत पर्ण पेठे तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो पर्ण पेठे सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: Did you know Actress Parna Pethe's father is also a famous face in the Marathi industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.