मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णींच्या मुलाला पाहिलात का ?, तो ही आहे अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:39 IST2022-01-05T07:00:00+5:302022-01-04T17:39:44+5:30

मृणाल (Mrinal Kulkarni)यांनी मराठी आणि हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय आहे. बारावीत शिकत असताना त्यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते.

Did you know actress mrinal kulkarni son virajas kulkarni also actor | मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णींच्या मुलाला पाहिलात का ?, तो ही आहे अभिनेता

मराठमोळ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णींच्या मुलाला पाहिलात का ?, तो ही आहे अभिनेता

कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni). आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय. बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. मात्र त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले.

१० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत.दोघांना एक मुलगा आहे..मृणाल कुलकर्णी यांचा मुलाचे नाव विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आहे. आईप्रमाणे विराजस ही अभिनेता आहे विराजसचा  जन्म पुण्यात झाला. त्याने एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून घेतलं..

विराजस मालिकांमध्ये काम केलं आहे. माझा होशील ना या मालिकेत त्याने आदित्यची भूमिका साकारली होती.  विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.

विराजस सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो आणि या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. विराजस अभिनेत्री शिवानी रांगोळेला डेट करत असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे, सोशल मीडियावर दोघे एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. 

 

Web Title: Did you know actress mrinal kulkarni son virajas kulkarni also actor