अभिनेता प्रसाद ओकनं सहकुटुंब घेतेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाला- "वर्षा" वर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 02:05 PM2022-09-09T14:05:40+5:302022-09-09T17:19:29+5:30

प्रसादनं नुकतंच सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यानचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Dharamveer fame Prasad oak meets cm Eknath Shinde | अभिनेता प्रसाद ओकनं सहकुटुंब घेतेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाला- "वर्षा" वर...

अभिनेता प्रसाद ओकनं सहकुटुंब घेतेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाला- "वर्षा" वर...

googlenewsNext

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याच्यासाठी हे वर्ष सर्वार्थाने यशस्वी ठरलं. या वर्षात त्याचा ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer- Mukkam Post Thane) हा सिनेमा तुफान गाजला. शिवाय याच वर्षात प्रसादने दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ या प्रसादच्या सिनेमाची इतक्या महिन्यानंतरही क्रेझ कायम आहे. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमातील प्रसादच्या लुकची, त्याच्या अप्रतिम अभिनयाची आणि चित्रपटातील त्याच्या संवादांची चर्चा आजही होताना दिसते. 

प्रसाद ओकने ‘धर्मवीर या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून आलं. चित्रपटातील प्रसादचा अभिनय पाहून सगळेच भारावून गेले. आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत.

दरम्यान अभिनेत्याने नुकतंच सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत सहभोजनसुद्धा केलं. प्रसादने स्वतः फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी वर्षावर प्रसादसोबत पत्नी आणि अभिनेत्री मंजिरी ओक आणि मुलगासुद्धा उपस्थित होता.

 

प्रसादची इन्स्टाग्राम पोस्ट
काल "वर्षा" वर मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांसोबत सहकुटुंब सहभोजनाचा योग आला.मनःपूर्वक आभार मा. खा. श्रीकांत शिंदे साहेब आणि मा. एकनाथ जी शिंदे साहे. 

Web Title: Dharamveer fame Prasad oak meets cm Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.