"इतका मोठा स्टार झाला तरी जमिनीवर"; 'सैराट' फेम अभिनेत्याचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:17 IST2025-08-14T20:16:51+5:302025-08-14T20:17:14+5:30
Tanaji Galgunde : तानाजी सध्या त्याच्या गावात असून तिथल्या कामात छान रमला आहे. हल्ली तो सोशल मीडियावर गावाकडची सकाळ दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

"इतका मोठा स्टार झाला तरी जमिनीवर"; 'सैराट' फेम अभिनेत्याचं होतंय कौतुक
'सैराट' (Sairat) चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते आर्ची आणि परश्या. त्यांच्यासोबत लंगड्या, सल्या आणि आनीदेखील आठवते. हे सगळीच पात्रं चांगलीच लोकप्रिय ठरले. या चित्रपटात लगंड्याची भूमिकेतून अभिनेता तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) घराघरात लोकप्रिय झाला. या सिनेमानंतर त्याने आणखी काही सिनेमात काम केलं. सध्या तो काय करतो, हे त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तानाजी सध्या त्याच्या गावात असून तिथल्या कामात छान रमला आहे. हल्ली तो सोशल मीडियावर गावाकडची सकाळ दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
तानाजी गळगुंडेने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, चित्रपटात जरी काम नाही मिळाले तरी गावच्या शेतीत मी काम करू शकतो. सध्या तो सिनेमातून ब्रेक घेत गावाकडे राहतो आहे. तिथले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो आहे. गावाकडची सकाळ असं त्याने सेगमेंट सुरू केलीय. यात तो दररोज त्याची गावातली सकाळ कशी असते तो दाखवताना दिसतो. या व्हिडीओत तो उठणे, ब्रश करणे, नाश्ता करणे मग शेतीची काही कामे असतील तर ती करताना दिसतो आहे. गाय बैलांची काळजी घेताना दिसतो आहे. त्याच्या या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
तानाजी गळगुंडेच्या गावाकडील सकाळ या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यातला त्याचा साधेपणा त्यांना खूप भावतो आहे. एका युजरने लिहिले की, तू इतका मोठा स्टार झाला पण साधेपण व गावची सवय नाही विसरला खरा जमीनीवर असलेला स्टार कलाकार आहे भाऊ तू. दुसऱ्या युजरने लिहिले की, मस्तच लहानपनीची आठवण करून दिलीस... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
आणखी एकाने लिहिले की, एका बाजूने विचार केला तर ,... असले जीवन जगायला नशीब लागत तर....दुसऱ्या बाजूने विचार केला तर.... असलं जीवन जगण्यासाठी अंगात आणि मनगटात बळ असावं लागत...हे पण तेवढंच खरं आहे. एका युजरने म्हटलं की, सैराटच्या माध्यमातून सर्वांचे मने जिंकलीस आपली कला चांगली सादर केली त्यासाठी तुझे अभिनंदन आणि गावाकडचा साधेपणा खरच तु उत्कृष्ठ कलाकार आहेस.