अजित पवारांवरील बायोपिकचा 'नायक' कोण?; उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं "हे" नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 10:39 IST2024-03-06T10:37:03+5:302024-03-06T10:39:48+5:30

अजित पवारांनी त्यांच्या बायोपीकसाठी या अभिनेत्याचं नाव सुचवलं आहे.

deputy cm Ajit Pawar want actor nilesh sable to play his role in biopic | अजित पवारांवरील बायोपिकचा 'नायक' कोण?; उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं "हे" नाव

अजित पवारांवरील बायोपिकचा 'नायक' कोण?; उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं "हे" नाव

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणात सक्रीय आहेत. अजित पवारांची वक्तव्यं राजकीय वातावरणात चर्चेत असतात. काल 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अजित पवारांची विशेष उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. गायक - संगीतकार अवधूत गुप्तेने यावेळी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्यावेळी बायोपीकमध्ये कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारावी? याविषयी अजित पवारांनी मौन सोडलंय.

अवधूत गुप्तेने अजित पवारांची 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' मध्ये मुलाखत घेताना दादांना विचारलं की, तुमच्यावर बायोपीक आला तर कोणत्या अभिनेत्याने भूमिका साकारावी?. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी निलेश साबळेंचं नाव घेतलं. याच कार्यक्रमात निलेश यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली. आपल्या मिमिक्रीची दखल अजित पवारांनी घेतली, याचा साबळेंना खुप आनंद झाला.

त्यामुळे भविष्यात अजित पवारांवर बायोपीक आलाच तर त्यात  'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेंनी अजितदादांची भूमिका साकारली तर आश्चर्य वाटायला नको. 'झी चित्र गौरव पुरस्कार २०२४' मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लवकरच हा सोहळा झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: deputy cm Ajit Pawar want actor nilesh sable to play his role in biopic