लकी गर्लने केले बीचवर हॉट फोटोशूट, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 15:59 IST2020-03-21T15:53:21+5:302020-03-21T15:59:06+5:30

पहिल्याच सिनेमात तिचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता..

deepti sati share her beach side photo on instagram gda | लकी गर्लने केले बीचवर हॉट फोटोशूट, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

लकी गर्लने केले बीचवर हॉट फोटोशूट, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री दीप्ती सतीने सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.  दीप्ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. दीप्तीने काही दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्यावरचे तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दीप्ती वेगवेगळ्या पोज देताना दिसते. फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करणाऱ्या आहेत.दीप्तीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.

या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात पहायला मिळाली नाही. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

Web Title: deepti sati share her beach side photo on instagram gda