लकी गर्ल म्हणून आहे या मराठी अभिनेत्रीची ओळख, तर साऊथमध्ये ही आहे तिचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 16:09 IST2020-02-24T16:07:44+5:302020-02-24T16:09:28+5:30

पहिल्याच सिनेमात तिचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाला होता.

Deepti sati looks gorgeous in her new photo | लकी गर्ल म्हणून आहे या मराठी अभिनेत्रीची ओळख, तर साऊथमध्ये ही आहे तिचा बोलबाला

लकी गर्ल म्हणून आहे या मराठी अभिनेत्रीची ओळख, तर साऊथमध्ये ही आहे तिचा बोलबाला

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. मात्र यावेळी दीप्तीने ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. या पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये दीप्ती खूपच सुंदर दिसते आहे. तिचे सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स ही तिच्या प्रेमात पडले आहेत.दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.

इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये ती पहायला मिळाली होती. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात पहायला मिळाली नाही. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे. 

Web Title: Deepti sati looks gorgeous in her new photo