'लकी' सिनेमातील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? सोशल मीडियावर असते तिच्या फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 10:15 IST2019-12-16T10:15:09+5:302019-12-16T10:15:16+5:30

96 मुलींच्या ऑडिशन्समधून तिची लकी सिनेमासाठी निवड झाली होती.

Deepti sati her new instagram | 'लकी' सिनेमातील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? सोशल मीडियावर असते तिच्या फोटोंची चर्चा

'लकी' सिनेमातील या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ? सोशल मीडियावर असते तिच्या फोटोंची चर्चा

अभिनेत्री  दीप्ती सती  सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखीस चांगलाच भावतो.


नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या दीप्तीने यावेळी ट्रेडिशनल लूकमधला फोटो शेअर करत सगळ्यांना क्लीन बोल्ड केले आहे. यात दीप्तीने पिवळ्या रंगाचा स्कर्ट आणि निळ्या रंगाचा टॉप घेतला आहे. दीप्तीचा हा अंदाजसुद्धा तिच्या फॅन्सना भावला आहे. दीप्तीच्या या फोटावर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.

इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती.
 

Web Title: Deepti sati her new instagram