लकी गर्ल करतेय उत्तराखंडमध्ये स्नो फॉल एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 07:15 IST2020-03-05T07:15:00+5:302020-03-05T07:15:00+5:30

या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Deepti sati enjoying snowfall in uttarakhand gda | लकी गर्ल करतेय उत्तराखंडमध्ये स्नो फॉल एन्जॉय

लकी गर्ल करतेय उत्तराखंडमध्ये स्नो फॉल एन्जॉय

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. दीप्तीचा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या फोटोतील अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. दीप्ती सध्या उत्तराखंडमध्ये आहे. दीप्ती इथं नेमकी व्हॅकेशन एन्जॉय करायला गेली की सिनेमाच्या शूटिंगसाठी हे अद्याप कळलेले नाही. फोटोत तिने पिवळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. फोटोत दिप्तीच्या मागे बर्फाचे डोंगर दिसतायेत. या फोटोमध्ये दिप्ती खूपच क्युट दिसतेय..दीप्तीच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


मराठी सिनेइंडस्ट्रीतील लकी गर्ल म्हणजेच अभिनेत्री दीप्ती सतीची ओळख आहे. अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले.


इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये ती पहायला मिळाली होती. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात पहायला मिळाली नाही. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.

Web Title: Deepti sati enjoying snowfall in uttarakhand gda