'दगडी चाळ २' सिनेमाला दोन वर्ष पूर्ण, पूजा सावंतने शेअर केली पोस्ट, म्हणाली- बोलावे तितके कमीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:31 IST2023-08-19T14:30:03+5:302023-08-19T14:31:03+5:30

पूजा सावंतने या निमित्ताने एक न पाहिलेला पडद्यामागचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'Dagdi Chaal 2' movie completes two years, Pooja Sawant shared a special post | 'दगडी चाळ २' सिनेमाला दोन वर्ष पूर्ण, पूजा सावंतने शेअर केली पोस्ट, म्हणाली- बोलावे तितके कमीच...

'दगडी चाळ २' सिनेमाला दोन वर्ष पूर्ण, पूजा सावंतने शेअर केली पोस्ट, म्हणाली- बोलावे तितके कमीच...

अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. २०१० साली क्षणभर विश्रांती (Kshanbhar Vishranti) या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दगडी चाळ (Dagadi Chawl), लपाछपी (Lapachhapi) या चित्रपटातून तिने अभिनयाची छाप सोडली आहे. पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. अशीच एक पोस्ट सध्या पूजाची व्हायरल होते. 


दरम्यान दगडी चाळ २ सिनेमाला आज दोन वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्त पूजाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. 

पूजाची पोस्ट
''दगडी चाळ २ , वर्षपुर्ती माझ्या ह्या टिमबद्दल बोलावे तितके कमीच आहे , खरतर टिम नाही .. एक गोड कुटुंबच म्हणेन मी ..sangeetaahir खुप सारे thank you सर्वांना एकत्र आणल्याबद्दल Thank you , ankushpchaudhari आम्हां सर्वांना नेहमीच योग्य आणि खरा मार्ग दाखवल्याबद्दल, Thank you, chandrakant kanse माझे लाडके चंदू सर, मला ‘एक अभिनेत्री’ म्हणुन घडवल्याबद्दल .. trust me .. there is no one like you  आणि sanjay_jamkhandi सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील्याबद्दल , मग ती ‘भेटली तु पुन्हा’ ची अश्विनी असो किंवा दगडी चाळ ची ‘कलरफुल’ खरंच मनापासून thank you कलरफुलचा सिनेमातला प्रवास जरीही संपला असला तरीही तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायमची जिवंत राहील.''

पूजाच्या या पोस्टवर एक यूजर्सने, ''खूप छान चित्रपट.'' दुसऱ्याने लिहिले,'' खूप सुंदर काम केलय ताई.'' आणखी एक यूजर्सने कमेंट करत दगडी चाळ ३ कधी येणार असा प्रश्न विचारला आहे. 

Web Title: 'Dagdi Chaal 2' movie completes two years, Pooja Sawant shared a special post