क्रेडिटेबल तरूणाईची क्रेडिटेबल कलाकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 12:22 IST2016-07-15T06:52:48+5:302016-07-15T12:22:48+5:30
कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी हा चित्रपट तरूणांची क्रेडिटेबल कलाकृती आहे. तरूणाईभोवती या चित्रपटाचं ...
.jpg)
क्रेडिटेबल तरूणाईची क्रेडिटेबल कलाकृती
क ंचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी हा चित्रपट तरूणांची क्रेडिटेबल कलाकृती आहे. तरूणाईभोवती या चित्रपटाचं कथानक रचण्यात आलं आहे. प्लास्टिक मनी ही आजच्या तरूणाईची एक मोठी समस्या बनली आहे. तिच या चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्लास्टिक मनीच्या संदर्भात नातेसंबंधांच प्रभावी चित्रिकरण या चित्रपटात हलक्याफुलक्या पध्दतीने करण्यात आले आहे. सुबोध भावे व क्रांती रेडेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. वैशाली सामंत यांनी संगीतबध्द केलेली दोन गाणी चित्रपटाला चार चाँद लावतात. या चित्रपटामधील लुटला लुटला हे गाणेदेखील स्वत: सुबोध व क्रांतीने गायलं आहे. तर मंदार चोळकरनं लिहिलेल्या गाण्याचं संगीत देखील एकदम पेपी आहे. १५ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.