पहिल्या भेटीत वाटला उद्धट, मग त्याच्याच प्रेमात पडली; वाचा कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 19:03 IST2023-12-19T19:01:19+5:302023-12-19T19:03:48+5:30

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे लोकप्रिय अभिनेत्री आहे.

comedy queen Shreya Bugde and Nikhil Sheth Love Story | पहिल्या भेटीत वाटला उद्धट, मग त्याच्याच प्रेमात पडली; वाचा कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेची लव्हस्टोरी

पहिल्या भेटीत वाटला उद्धट, मग त्याच्याच प्रेमात पडली; वाचा कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेची लव्हस्टोरी

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी श्रेया बुगडे लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे श्रेयाला खरी ओळख मिळाली. सोशल मीडियावर श्रेया नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. श्रेयाच्या व्यावसायिक आयुष्याबत सर्वांनाच बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत आणि लव्हलाईफबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. 

श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे.  श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह झाला. 'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली. पण, पहिल्याच भेटीत निखील हा श्रेयाला उद्धट वाटला होता. ही मालिका सुरू झाल्याच्या ५ महिन्यांच्यानंतर निखीलने ही मालिका सोडली. 

यानंतर गुंतता हृदय हे या मालिकेचा निखील हा कार्यकारी निर्माता बनला आहे. मालिकेचा प्रोमा चांगला झाल्याने श्रेयाने त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांच्या संवादाला सुरुवात झाली. नंतर हळुहळु त्याची प्रतिमा बदलत गेली आणि श्रेया निखीलच्या प्रेमात पडली. अखेर कुटुंबीयांच्या सहमतीने दोघांचं लग्न जुळलं. आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकासोबत आनंदात आहेत. 

श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट, टीव्ही मालिकांमधून श्रेयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधून श्रेयानं प्रेक्षकांच मनोरंजन केलं. सध्या ती ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. उत्तम अभिनय व विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ती लोकप्रिय आहे.

Web Title: comedy queen Shreya Bugde and Nikhil Sheth Love Story