चंबळच्या घाटीत चौर्य चे शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:36 IST2016-07-30T12:04:36+5:302016-07-30T17:36:40+5:30

             चौर्य हा सिनेमा प्रदर्शना पुर्वीच खुप चर्चेत आहे. एका वेगळ््या विषयावर दिग्दर्शक समीर ...

Chubby valley cruelty shooting | चंबळच्या घाटीत चौर्य चे शुटिंग

चंबळच्या घाटीत चौर्य चे शुटिंग


/>             चौर्य हा सिनेमा प्रदर्शना पुर्वीच खुप चर्चेत आहे. एका वेगळ््या विषयावर दिग्दर्शक समीर पाटिल यांनी या चित्रपटातून प्रकाश टाकला आहे.  या सिनेमाचे शुटिंग चंबळच्या घाटीत झाले आहेत. साऊथच्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री तीर्था मुरबाडकर ही मराठमोळी मुलगी आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी तिच्याशी संवाद साधला असता तीने अनेक गोष्टींचा उलगडा केला.

         

या सिनेमाचे शुटिंग चंबळच्या घाटीत करण्याचे ठरले. माझ्यासाठी हा खरच एक थरारक अनुभव होता. जेव्हा मला समजले की चंबळच्या घाटीत जायचेय तेव्हा मी खुपच एक्सायटेड होते पण माझ्या आई-वडीलांना थोडी भीती वाटली. सेटवर मी एकटीच मुलगी होते. हॉटेल पासुन सेटपर्यंत आम्हाला गाडीतून ड्रायव्हर न्यायचा. त्याच्या गाडीत हॉकी स्टीक अन बाकी हत्यारे असायचे. तो माहोलच खुप वेगळा होता. पण माझी ही पहिलीच मराठी फिल्म असल्याने मी झापाटून काम केले. एवढेच नाही तर तीर्थाने एफटीआय मधुन अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. जेव्हा  फिल्म इन्स्टीट्युट मधुन कोर्स पुर्ण करुन ती बाहेर  पडली तेव्हा तिला पहिलीच फिल्म साऊथची मिळाली. साऊंथा वोरु या तेलगु चित्रपटामध्ये तिने काम केले आणि बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्डही मिळवला. आता साऊथमधील या अभिनेत्रीचा मराठमोळा तडका पहायचा असेल तर चौर्य सिनेमाचीच वाट पहावी लागणार आहे. 

              

Web Title: Chubby valley cruelty shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.