रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 02:00 PM2024-04-21T14:00:40+5:302024-04-21T14:02:20+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने खूप प्रेम दिलं पण... काय म्हणाला चिन्मय मांडलेकर पाहा.

Chinmay Mandlekar wont do role of Chhatrapati Shivaji Maharaj hereafter because of trolling over his son s name Jahangir | रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग

रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग

मराठी अभिनेताचिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करतोय. एका पॉडकास्टमध्ये लेकाचं नाव 'जहांगीर' असल्याचं सांगताच त्याच्यावर टीका होऊ लागली. ही टीका त्याच्यापुरती मर्यादित न राहता त्याची पत्नी आणि मुलावरही वाईट भाषेत टीका झाली. हे सहन न झाल्याने काल चिन्मयची पत्नी नेहाने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. तर आज चिन्मय मांडलेकरनेही एक व्हिडिओ शेअर करत मोठा निर्णय जाहीर केला आहे. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारणार नाही असं त्याने म्हटलं आहे. कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने चाहते मात्र निराश झालेत.

चिन्मयने दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराय अष्टक'मधील सर्वच सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. मात्र सीरिजच्या यापुढील सिनेमांमध्ये तो ही भूमिका करणार नाही असा थेट निर्णय त्याने घेतला. 

काय म्हणाला चिन्मय मांडलेकर?

नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. काल माझ्या पत्नीने नेहाने व्हिडिओ शेअर केला होता. त्यात माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरुन होणारं ट्रोलिंग आणि कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अतिशय घाणेरड्या, अश्लाघ्य कमेंट्स होतं. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरही कमेंट्समधअये कमी झालीये का तर अजिबात नाही. उलट त्या वाढल्यात. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतोय. मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास सोशल मीडियावरुन होत असेल तर त्याच्याशी मी बांधील नाही. माझ्या कामावरुन मला वाटेल ते बोलू शकता आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही."

"मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं यावर मी आधाीही बऱ्याच मुलाखतींमधून बोललो आहे. माझ्या पत्नीनेही काल व्हिडिओतून त्याची कारणमिमांसा केली त्यामुळे मी ते बोलून वेळ वाया घालवत नाही. मला इतकंच सांगायचंय मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो आतापर्यंत सहा सिनेमांमध्ये मी ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का हा ट्रोलर्सचा प्रमुख सूर आहे. माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला आज तो ११ वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं ते आता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. देशातील, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचंही प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या  कुटुंबाला अशाप्रकारे त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण मी करत असलेलं काम, भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर वडील, नवरा, कुटुंब प्रमुख म्हणून मला ते जपणं खूप महत्वाचं आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दल जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तेच मी भूमिकेतून मांडलं. अगदी माझ्या गाडीतही जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे. हा दिखावा नाही प्रेम आहे श्रद्धा आहे. पण मी का सिद्ध करु लोकांना. त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं."

नाव खटकतंय मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशाने भारतरत्न दिलं. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा). टाटांनी उभी केलेली एअर इंडिया ज्यातून आपण अभिमानाने प्रवास करतो, उभे केलेले उद्योग ज्याचा फायदा भारतात प्रत्येक नागरिकाला होतो. त्याचा वापर करताना आपण हा विचार करतो का की याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं. त्यांचं टायटनचं घड्याळ, गाड्या असतील ते वापरताना हा विचार करत नाही. पण ठिके मी एक अभिनेता आहे अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. इथे अजून एक गोष्ट नमूद करु इच्छितो की अनेकांनी म्हटलं की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलंत म्हणून तुम्हाला हे होणारंच. माझं चॅलेंज आहे की मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला, प्लॅटफॉर्मवर गेलोय, किंवा कोणत्या नेत्याच्या अधिपत्याखाली वावरलोय असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना मी पॉडकास्टमध्येही मी हे नमूद केलं होतं की मी दर निवडणूकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे, पुन्हा स्पष्टीकरण देण्यात अर्थ नाही. महाराजांच्या भूमिकेने मला आतापर्यंत खूप प्रेम दिलं. पण या भूमिकेने जर माझ्या कुटुंबाला, माझ्या ११ वर्षांच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी जाहीर करतो की इथून पुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही."

Web Title: Chinmay Mandlekar wont do role of Chhatrapati Shivaji Maharaj hereafter because of trolling over his son s name Jahangir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.