हॉन्टेड व्हीलामध्ये चीटरचे फन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:47 IST2016-06-03T07:17:23+5:302016-06-03T12:47:23+5:30

             भुताटकीच्या गप्पा गोष्टी ऐकण्यात बºयाच जणांना रस असतो. अशाप्रकारचे चित्रपट देखील क्युरिअसली पाहिले ...

Cheater Fun in Haunted Wheel | हॉन्टेड व्हीलामध्ये चीटरचे फन

हॉन्टेड व्हीलामध्ये चीटरचे फन


/>             भुताटकीच्या गप्पा गोष्टी ऐकण्यात बºयाच जणांना रस असतो. अशाप्रकारचे चित्रपट देखील क्युरिअसली पाहिले जातात. भुतबंगले, हॉन्टेड हाऊस म्हणजे असते तरी काय नक्की. भुतांच्या वास्तव्यांने मंतरलेली ती घरे तर नाहीत ना असे अनेक प्रश्न सहस्यमयी विषयात आवड असलेल्या लोकांना पडले असणारच. आता असेच काही म्हणत आहे मराठी इंडस्ट्रीची ब्युटी क्वीन पुजा सावंत. अहो ती नूसते म्हणतच नाही तर चक्क हॉन्टेड व्हीला मध्ये जाऊन राहिली आहे. पुजाने सोशल साईट्सवर एक फोटो अपलोड करुन ती सांगते, हॅड फन इन हॉन्टेड व्हीला इन मॉरिशस. पुजा डायरेक्ट एका हॉन्टेड व्हीला मध्ये पोहचली आहे अन ते पण मॉरिशसमधील. तिला भीती वाटायचे तर दुरच पण ती तिथे जाऊन ती मजा करीत आहे. आता पुजाला त्या हॉन्टेड व्हीला मध्ये कशीकाय मजा आली हे तीलाच माहित पण आपली ही पठ्ठी एवढ्यावर थांबलेली नाही बर का, तर तिने सर्वांना विचारले आहे, आर यु गाईज रेडी टु मिट द घोस्ट. भुतांना टिव्ही किंवा पुस्तकातच पाहणाºया प्रेक्षकांसाठी पुजाने चांगलाच प्रस्ताव ठेवला आहे डायरेक्ट भुतांना भेटायचा. हो पुजा सावंत लवकरच सर्वांना भुताची भेट घालुन देणार आहे ते म्हणजे तिच्या आगामी चीटर या चित्रपटातून. पुजा सावंत अन वैभव तत्ववादी यांच्या प्रमुख भुमिका असलेला चीटर हा सिनेमा १० जुन रोजी प्रदर्शित होत आहे. अन या चित्रपटाचे  शुटिंग मॉरिशसमधील एका हॉन्टेड व्हीला मध्ये करण्यात आले आहे. आता पुजाचा हा प्रस्ताव स्वीकारुन किती जण खरच हे हॉन्टेड हाऊस पहायला अन भुतांना भेटायला जातात ते आपल्याला लवकरच समजेल.

                 {{{{twitter_post_id####}}}}

                       

Web Title: Cheater Fun in Haunted Wheel