'बॉर्डर' फेम अभिनेत्याची दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात एन्ट्री, 'रणपति शिवराय'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:01 IST2026-02-02T16:00:26+5:302026-02-02T16:01:50+5:30

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात बॉर्डर फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूड अभिनेता पुनीत इस्सर या मराठी सिनेमात दिसणार आहेत. 

border fame actor puneet issar to play important role in digpal lanjekar ranpati shivray marathi movie | 'बॉर्डर' फेम अभिनेत्याची दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात एन्ट्री, 'रणपति शिवराय'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

'बॉर्डर' फेम अभिनेत्याची दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमात एन्ट्री, 'रणपति शिवराय'मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

शिवराजअष्टकमधील सहावं पुष्प 'रणपति शिवराय -स्वारी आग्रा' हा सिनेमा ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना शिवरायांच्या शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय पाहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक सिनेमात बॉर्डर फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. बॉलिवूड अभिनेता पुनीत इस्सर या मराठी सिनेमात दिसणार आहेत. 

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलेले पुनती इस्सर 'रणपति शिवराय' सिनेमात महत्त्वाची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.


महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे.

या सिनेमात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर औरंगजेबाची भूमिका समीर धर्माधिकारी साकारताना दिसणार आहे. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, अजय  पूरकर, स्मिता शेवाळे, ऋषी सक्सेना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title : 'बॉर्डर' फेम पुनीत इस्सर 'रणपति शिवराय' में मिर्ज़ा राजे जयसिंग बने

Web Summary : 'बॉर्डर' के अभिनेता पुनीत इस्सर, दिगपाल लांजेकर की 'रणपति शिवराय' में मिर्ज़ा राजे जयसिंग की भूमिका निभाएंगे। फिल्म 6 फरवरी को रिलीज़ होगी, जिसमें शिवाजी महाराज की आगरा यात्रा का चित्रण है। अभिजीत श्वेताचंद्र शिवाजी और समीर धर्माधिकारी औरंगजेब की भूमिका में हैं।

Web Title : 'Border' actor Puneet Issar joins 'Ranapati Shivray' as Mirza Raje

Web Summary : Puneet Issar, known for 'Border,' joins Digpal Lanjekar's 'Ranapati Shivray' as Mirza Raje Jaising. The film, releasing February 6th, depicts Shivaji Maharaj's Agra visit. Abhijit Shwetachandra plays Shivaji; Samir Dharmadhikari, Aurangzeb.