तेजस्विनी पंडितने शेअर केला सर्वात बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 16:40 IST2021-01-29T16:30:32+5:302021-01-29T16:40:46+5:30

यापूर्वीदेखील तेजस्विनीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

The boldest photo shared by tejaswini Pandit is going viral on social media | तेजस्विनी पंडितने शेअर केला सर्वात बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

तेजस्विनी पंडितने शेअर केला सर्वात बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. तिचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तेजस्विनी पंडितने नुकतेच नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. यात तिने बॅकलेस ब्लॉज साडीसोबत परिधान केला. यात ती खूप बोल्ड अंदाजात दिसते आहे.

यापूर्वीदेखील तेजस्विनीने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या साडीत तेजस्विनी खूपच सुंदर दिसते आहे. तेजस्विनीच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.  

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.
 

Web Title: The boldest photo shared by tejaswini Pandit is going viral on social media