बोल्ड अभिनेत्री नेहा २ वर्षानंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, पहा चित्रपटाचा फर्स्ट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:00 IST2019-12-01T06:00:00+5:302019-12-01T06:00:00+5:30

नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी मराठी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Bold actress Neha Pendse to appear on screen after 2 years, see first look of film June | बोल्ड अभिनेत्री नेहा २ वर्षानंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, पहा चित्रपटाचा फर्स्ट लूक

बोल्ड अभिनेत्री नेहा २ वर्षानंतर झळकणार रुपेरी पडद्यावर, पहा चित्रपटाचा फर्स्ट लूक

अभिनेत्री नेहा पेंडसे वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. आता तर नेहा तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. एक बिनधास्त जीवन जगणारी मुलगी अशी नेहाची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका,नेहाला जे आवडते ते ती करते. हिंदी आणि मराठी सिनेमा तसंच मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू तिने दाखवली आहे. 


नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर तिच्या आगामी मराठी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव आहे जून. चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत नेहा पेंडसेने लिहिले की, जूनमध्ये दोन व्यक्तीची कथा रेखाटण्यात आली आहे. जुनचं पहिलं पोस्टर. २०२०मध्ये होणार प्रदर्शित.


जून चित्रपटात नेहासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त किरण करमरकर व रेशम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


नेहा २०१७ साली नगरसेवक या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती जून या चित्रपटात दिसणार आहे. यादरम्यान ती काही मालिकांमध्ये काम करताना दिसली. तसेच नेहा लवकरच बॉयफ्रेन्ड शार्दुल सिंगसोबत लग्न करणार आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर मला शार्दुलच्या रूपात एक खरी व्यक्ती मिळाली.

ट्रोलर्समुळे मी त्याला गमावू इच्छित नाही, असेही ती म्हणाली. लग्नाचा प्लानही तिने सांगितला. आम्ही २०२०च्या सुरूवातीला लग्न करणार आहोत. महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होईल, असे तिने सांगितले.

Web Title: Bold actress Neha Pendse to appear on screen after 2 years, see first look of film June