'...धड जगताही येईना आणि मरताही', ज्येष्ठ अभिनेत्रीनं पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:11 PM2021-08-11T13:11:50+5:302021-08-11T13:12:08+5:30

मागील दीड वर्षांपासून चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग बंद आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

'... the body doesn't come alive and even dies', the veteran actress lamented with tears in her eyes | '...धड जगताही येईना आणि मरताही', ज्येष्ठ अभिनेत्रीनं पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली खंत

'...धड जगताही येईना आणि मरताही', ज्येष्ठ अभिनेत्रीनं पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली खंत

googlenewsNext

सिनेमा आणि नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे, धड जगताही येईना आणि मरताही येत नाही, अशी खंत नुकतीच ज्येष्ठ मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली.कलारंग परिवार सांस्कृतिक कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये श्री स्वामी समर्थ आदर्श समाज सेवा पुरस्कार रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. शाल, गौरवचिन्ह, पिंपलवृक्षाचे रोप देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कलारंग परिवाराचे अध्यक्ष संतोष उभे यांनी केले होते. गायक चित्रसेन भवार, रविंद्र खराडे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

अभिनेत्री जयमाला या अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या पत्नी आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्या पाहायला मिळतात. त्यांच्या गाढवाचं लग्न या प्रसिद्ध नाटकाचे तब्बल २५०० हुन अधिक प्रयोग झाले होते. या नाटकाला राष्ट्रपती पदक विजेता नाटक म्हणून ओळख मिळाली होती.

जयमाला इनामदार यांचे सासरे डॉक्टर अप्पासाहेब इनामदार यांच्यानंतर पती प्रकाश इनामदार यांनी कलासंगम सांभाळले आता कलासंगमची धुरा जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार सांभाळताना पाहायला मिळतात. गेली ५५ वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे.


मागील दीड वर्षांपासून चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग बंद आहेत. नवरात्र गणेशोत्सव जत्रा यात्रा देखील बंद आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपला आहे, अशा परिस्थितीत उतार वयात दुसरे कुठलेही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा आर्त सवाल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी उपस्थित केला. 


यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तात्काळ प्रतिसाद देत आपल्या कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ कलाकारांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याची घोषणा केली. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले. त्यांनी रडतच हात जोडून आभार मानले. यावेळी उमेश चव्हाण यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि जयमाला इनामदार यांना वाकून नमस्कार करून घाबरू नका, काळजी करू नका. मी आहे असे म्हणताच काही काळ वातावरण भावनिक झाले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक कलाकारांना यावेळी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. 

Web Title: '... the body doesn't come alive and even dies', the veteran actress lamented with tears in her eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.