या प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरात आली चिमुकली परी... सरोगसीच्या माध्यमातून झाला बाळाचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 10:10 IST2018-05-08T04:40:17+5:302018-05-08T10:10:17+5:30
श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या आयुष्यात एका लहानशा चिमुकलीचा प्रवेश झाला आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या बाळाचा जन्म ...
.jpg)
या प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरात आली चिमुकली परी... सरोगसीच्या माध्यमातून झाला बाळाचा जन्म
श रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या आयुष्यात एका लहानशा चिमुकलीचा प्रवेश झाला आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या बाळाचा जन्म झाला. ४ मे ला त्यांच्या आयुष्यात ही परी आली असून श्रेयसने ही गोड बातमी नुकतीच मीडियाला सांगितली. श्रेयसने मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, १० मे ते १२ मे च्या दरम्यान आमच्या बाळाचे आगमन होईल असे सांगण्यात आले होते. तिच्या आगमनाला खूप दिवस बाकी असल्याने आम्ही दोघे फिरायला हाँगकाँग येथे गेलो होतो. तिथून आम्ही क्रूझवर जाणार होतो. पण आमच्यासाठी सरोगसी करणाऱ्या बाईला लेबर रूममध्ये नेण्यात आले असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही आमचा बेत रद्द केला आणि लगेचच भारतात परतलो. आम्ही विमानतळावर उतरल्या उतरल्या लगेचच ही गोड बातमी आम्हाला कळली. त्यामुळे आम्ही तिथूनच रुग्णालयात गेलो. आमची मुलगी ही खूपच छान आहे. तिचे कपाळ हे अगदी माझ्यासारखे आहे तर चेहऱ्याचा खालचा भाग हा दीप्तीसारखा आहे. तिचा चेहरा हा गोल असल्याने ती जास्त दीप्तीसारखी दिसते असे मला वाटते. पण लहान मुलांचा चेहरा हा सतत बदलत असल्याने ती कोणासारखी दिसते असे मी आता तरी ठामपणे सांगू शकत नाही.
श्रेयस आणि दीप्तीच्या आयुष्यात आलेल्या या परीचे नाव काय ठेवणार यावर श्रेयस सांगतो, आम्ही काही नावांचा विचार केला आहे. पण त्यातून कोणते नाव ठेवायचे हे अद्याप तरी ठरवलेले नाही. आमची मित्रमंडळी अनेक नावाचे पर्याय देऊन आम्हाला अजून संभ्रमात टाकत आहेत.
श्रेयस आणि दीप्तीने त्यांच्या मुलीच्या जन्मासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला याविषयी देखील श्रेयसने मुंबई मिररशी बोलताना सांगितले. तो सांगतो, काही वैद्यकीय अडचणी असल्याने आम्ही हा पर्याय निवडला. पण हा आमच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला निर्णय आहे असे मी नक्कीच सांगेन.
श्रेयसच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण १५ मे पासून सुरू होणार होते. पण या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले गेले असल्याने आता त्याचे चित्रीकरण जून मध्ये सुरू होणार आहे. चित्रपटाच्या तारखांमध्ये अचानक काही बदल झाले असल्याने श्रेयसला जास्तीत जास्त वेळ मुलीसोबत घालवता येणार आहे याचा त्याला खूपच आनंद होत आहे.
![shreyas talpade deepti talpade]()
Also Read : जाणून घ्या श्रेयस आणि दीप्तीच्या प्रेमाची गोष्ट!