Bigg Bossफेम शर्मिष्ठा राऊतने बिझनेसमन तेजस देसाईसोबत गुपचुप उरकला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:43 AM2020-06-22T10:43:59+5:302020-06-22T10:44:07+5:30

लवकरच शर्मिष्ठा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Bigg Boss fame sharmishtha raut got engage with tejas desai | Bigg Bossफेम शर्मिष्ठा राऊतने बिझनेसमन तेजस देसाईसोबत गुपचुप उरकला साखरपुडा

Bigg Bossफेम शर्मिष्ठा राऊतने बिझनेसमन तेजस देसाईसोबत गुपचुप उरकला साखरपुडा

googlenewsNext

बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा पार पडला आहे. लवकरच शर्मिष्ठा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शर्मिष्ठाच्या होणाऱ्या पतीचे नाव तेजस देसाई आहे. इगतपुरीला केवळ 35 लोकांच्या उपस्थिती शर्मिष्ठा आणि तेजसचा साखरपुडा झाला.

न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार एका मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले, ''तिचा साखरपुडा एप्रिलमध्ये होणार होता पण अचानक झालेल्या लॉकडाऊनमध्ये ते शक्य झाले नाही. सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.'' मात्र अद्याप लग्नाची तारीख सांगितलेली नाही. शर्मिष्ठाचा होणार पती तेजस हा बिझनेसमन असल्याची माहिती आहे. शर्मिष्ठाचे हे दुसरं लग्न आहे. 

शर्मिष्ठाने 'मन उधाण वाऱ्याचे‘मधील साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी‘मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने उत्तम कामगिरी बजावली.

जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील तिने भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Bigg Boss fame sharmishtha raut got engage with tejas desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.