मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्यावर असा पेहराव करण्याची का आली वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:30 IST2019-07-25T06:30:00+5:302019-07-25T06:30:00+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्याला अशा पेहरावात ओळखणंही कठीण झालं आहे.

Bhushan Pradhan will be seen in Gondya Ala re web series | मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्यावर असा पेहराव करण्याची का आली वेळ?

मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्यावर असा पेहराव करण्याची का आली वेळ?

अभिनेता भूषण प्रधानने मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने त्याचे तोंड झाकलेलं दिसत आहे. हा त्याचा लूक त्याची आगामी वेबसीरिजमधील आहे. तो झी ५ अॅपच्या गोंद्या आला रे या सीरिजमध्ये झळकणार आहे. 

काही दिवसांपूर्वी भूषण प्रधान याने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये टक्कल करत असल्याचं पहायला मिळालं होतं. हा बाल्ड लूकदेखील वेबसीरिजसाठी केला होता.

नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याने तोंड झाकलेला दिसतो आहे. या गेटअपमध्ये त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं की, इतिहासाची पानं पलटताना फार कमी लोकांना माहित आहे भारतातील क्रांतीमधील पहिल्या युवकाबद्दल. गोंद्या आला रे. लवकरच झी ५वर.


 भूषणनं २५ जून रोजी इंस्टाग्रामवर चाळीस -पन्नासच्या दशकातील एका वेशभूषेचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसह त्याने लिहिलं की, २५ जून आज तुमचा वाढदिवस... तुमची जयंती. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा जन्म चिंचवडचा आणि मी लहानाचा मोठा झालो तो चिंचवड येथेच. लहानपणी बाबांबरोबर स्कूटरवरून फिरताना न चुकता चौकात पोहोचल्यावर मान वर करून तुमच्या पुतळ्याकडे बघायचो. इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या बद्दल एका धड्यात वाचताना सुद्धा खूप अभिमान वाटायचा. तेव्हा कल्पनाही नव्हती की मोठा झाल्यावर एक दिवस मला तुमची भूमिका साकारायला मिळेल. झी5 साठीची ही web series लवकरच प्रदर्शित होईल. चित्रिकरण अतिशय उत्तम आणि जोमाने सुरु आहे. आज भूमिकेसाठी म्हणून तुमचं आत्मवृत्त वाचताना, तुमच्या बद्दल अजून जाणून घेताना एकच लक्ष्यात येतंय की किती कमी माहित होतं मला तुमच्याबद्दल. तुमची भूमिका योग्यरित्या साकारता यावी म्हणून मी, आमचे निर्माते, दिग्दर्शक आणि अख्खी टीम मनापासून कष्ट घेत आहोत. तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात.

Web Title: Bhushan Pradhan will be seen in Gondya Ala re web series