भार्गवी आणि दिप्तीची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 18:11 IST2016-09-09T12:41:41+5:302016-09-09T18:11:41+5:30
अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि दिप्ती देवी या पेज ४ या चित्रपटात एकत्रित झळकणार आहे. त्यामुळे या दोघींमध्ये खूप छान ...

भार्गवी आणि दिप्तीची धमाल
अ िनेत्री भार्गवी चिरमुले आणि दिप्ती देवी या पेज ४ या चित्रपटात एकत्रित झळकणार आहे. त्यामुळे या दोघींमध्ये खूप छान दोस्ताना निर्माण झाला आहे. त्यांच्या या यारीबद्दल लोकमत सीएनएक्शी बोलताना दिप्ती सांगते. या चित्रपटाच्या वेळी आमची खूप छान मैत्रिणी झाली आहे. चित्रिकरणाच्या दरम्यान वेळ मिळताच मी, भार्गवी व मधुरानी एकत्रित खूप मस्ती व धमाल करत असतो. सेल्फी व एक से एक फोटोसेशन करून सोशलमीडियावर अपलोड करत असतो. त्याचबरोबर भार्गवीसोबत काम करण्याचा अनुभवदेखील खरचं खूप छान होता. चित्रपटसृष्टीत भार्गवी व मधुरानी यांच्यापेक्षा मला कमी अनुभव आहे. पण या दोघींनी ही मला कधी ही तसे जाणवून दिले नाही. त्यामुळे खरचं काम करताना देखील मला खूप छान वाटले. तसेच या दोन अभिनेत्रींपासून खरचं मला खूप काही शिकायला मिळाल.
![]()