रंगभूमीवर भरत - संदीप पहिल्यांदा एकत्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 17:55 IST2016-07-14T12:25:18+5:302016-07-14T17:55:18+5:30

Exculsive - बेनझीर जमादार आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कलाकार भरत जाधव व संदीप पाठक आता, पहिल्यांदा रंगभूमीवर ...

Bharat on theater - Sandeep first gathered | रंगभूमीवर भरत - संदीप पहिल्यांदा एकत्रित

रंगभूमीवर भरत - संदीप पहिल्यांदा एकत्रित

ong>Exculsive - बेनझीर जमादार

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे कलाकार भरत जाधव व संदीप पाठक आता, पहिल्यांदा रंगभूमीवर एकत्रित पाहायला मिळणार आहे. मास्टर ब्लास्टर या नाटकाच्या माध्यमातून हे दोन कलाकार प्रेक्षकांना हसविण्यास सज्ज झाले आहे. मास्टर ब्लास्टर हे नाटक गुरू - शिष्य या नात्यावर आधारित आहे. यामध्ये गुरूच्या भूमिकेत भरत जाधव तर शिष्याच्या भूमिकेत संदीप पाठक पाहायला मिळणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना संदीप म्हणाला, यामध्ये मी श्याम या शिष्याच्या भूमिकेत आहेत. या भूमिकेतून तुम्हाला एक  टपोरी विद्यार्थी पाहायला मिळेल. तसेच भरत जाधव या अभिनेत्यासेबत काम करताना एक वेगळीच उर्जा  मिळते. त्यामुळे भरत जाधव यांसारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक असतो. तसेच त्यांच्या काही गोष्टी आपल्या अभिनयात प्लस करण्याचा प्रयत्नदेखील करीत असतो. भरत कडून टायमिंग, वक्तशीरपणा, शिस्तपणा व प्रामाणिकपणा या गोष्टी शिकण्यास देखील मिळाल्या आहेत. या नाटकांचा शुभारंभ २२ जुलैला होत असून, या नाटकाची निर्मिती कविता मच्छिंद्र कांबळी आणि  सरिता भरत जाधव यांनी केली आहे. तर लेखन अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शन अद्वैत-रणजित यांनी केले आहे. मास्तर ब्लास्टर ही भद्रकाली प्रॉडक्शनची ५४ वी नाट्यकलाकृती आहे. या नाटकाच्या माध्यमातून भरत आणि संदीप या दोन्ही कलाकारांना एकत्रित रंगभूमीवर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहे. 

                 

 

Web Title: Bharat on theater - Sandeep first gathered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.