भरत जाधवला आवडतो 'हा' साऊथ अभिनेता, एका सिनेमामुळे बनला त्यांचा मोठा चाहता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:40 AM2023-08-16T10:40:16+5:302023-08-16T10:41:02+5:30

भरत जाधव लवकरच नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

bharat jadhav reveals kamal hasan is his favourite actor after watching pushpak movie | भरत जाधवला आवडतो 'हा' साऊथ अभिनेता, एका सिनेमामुळे बनला त्यांचा मोठा चाहता

भरत जाधवला आवडतो 'हा' साऊथ अभिनेता, एका सिनेमामुळे बनला त्यांचा मोठा चाहता

googlenewsNext

भरत जाधव (Bharat Jadhav) मराठीतील अतिशय लोकप्रिय अभिनेता. 'ऑल द बेस्ट', 'श्रीमंत दामोदर पंत', 'सही रे सही' अशा अनेक नाटकांनी त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा सहज सुंदर आणि विनोदी अभिनय प्रेक्षकांना पोटधरुन हसवतो. पण भरत जाधव यांचा आवडता अभिनेता कोण असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर नुकतंच त्याने एका मुलाखतीत याचं उत्तर दिलं आहे.

भरत जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या नाटकांनी एक काळ गाजवला आहे. अनेक अभिनेत्यांसोबत त्यांची जोडी जमली आहे. नाटकांसोबतच कित्येक हिट सिनेमेही त्यांनी केले आहेत. नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सेलिब्रिटी क्रश कोण आहे याचा खुलासा केला. त्यांचा आवडता अभिनेता हा साऊथमधला आहे. ते म्हणाले, 'मला नेहमीच कमल हसन आवडत होते. अशोक मामा, दिलीप प्रभावळकर हे सुद्धा वेगवेगळी कामं करायचे. त्यांच्या कामातील व्हेरिएशन मला खूप आवडायचे. कमल हसन का तर पुष्पक सिनेमा पाहिल्यापासून मी त्याचा जामच चाहता झालो.'

याशिवाय भरत जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांचेही अनुभव सांगितले. ते म्हणाले,'सही रे सहीच्या नाशइकच्या प्रयोगाला एका प्रेक्षकाकडे चुकून दोन तिकीटं आली. तो बाल्कनीत बसला होता. प्रयोग संपल्यानंतर तो बॅकस्टेज भेटायला आला. मला त्याने एक्स्ट्रा तिकीटाचे पैसे दिले. मी विचारलं का तर म्हणाला बाजूची सीट रिकामी होती. मी आळस केला काऊंटरवर जाऊन एक्स्ट्रा तिकीट परत द्यायचा. पण तुमची मेहनच बघितली तुमचे एवढे पैसे वाया घालवले. मला ते चुकीचं वाटलं म्हणून हे त्या तिकीटाचे पैसे.'

भरत जाधव लवकरच नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 'अस्तित्व' असं त्यांच्या नाटकाचं नाव आहे. त्यांच्या या नाटकासाठी सगळेच शुभेच्छा देत आहेत. शिवाय त्यांना पुन्हा सिनेमात बघाण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.

Web Title: bharat jadhav reveals kamal hasan is his favourite actor after watching pushpak movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.