30 वर्षानंतर भरत जाधवचा मोठा निर्णय; प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा होणार ओल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:59 PM2023-08-16T12:59:30+5:302023-08-16T12:59:53+5:30

Bharat jadhav: भरत सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी कायम चाहत्यांना अपडेट देत असतो.

bharat-jadhav-marathi-actor-take-important-decision-new-marathi-natak-astitva-after-sahi-re-sahi-comedy-natak | 30 वर्षानंतर भरत जाधवचा मोठा निर्णय; प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा होणार ओल्या

30 वर्षानंतर भरत जाधवचा मोठा निर्णय; प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा होणार ओल्या

googlenewsNext

मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात नाटकापासून किंवा मालिकांपासून केली. मात्र, तेच कलाकार आज रुपेरी पडदा गाजवत आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे भरत जाधव (bharat jadhav). नाटक, मालिका, एकांकिका आणि सिनेमा अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भरत जाधवचा वावर आहे. विशेष म्हणजे आपल्या विनोदी भूमिकेतून भरतने बऱ्याच प्रेक्षकांना हसवलं आहे. मात्र, यावेळी तो प्रेक्षकांना हळवं करणार आहे.

भरत सोशल मीडियावर सक्रीय असून त्याच्या फिल्मी करिअरविषयी कायम चाहत्यांना अपडेट देत असतो. यात नुकताच त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्याच्या हा मोठा निर्णय आहे. भरतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

भरत जाधवची 'ही' गाजलेली मालिका आठवते का? फोटोतील किती कलाकारांना तुम्ही ओळखलं?

"रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सही रे सही ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या भरतने मागील ३० वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे.पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळव करायला.. नवं नाटक घेऊन.. कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत.. भरत जाधव एंटरटेनमेंट, अस्तित्व," असं कॅप्शन देत भरत जाधवने त्याच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे.

दरम्यान, भरतचं अस्तित्व हे नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या नाटकाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
 

Web Title: bharat-jadhav-marathi-actor-take-important-decision-new-marathi-natak-astitva-after-sahi-re-sahi-comedy-natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.