ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:42 AM2020-01-03T11:42:27+5:302020-01-03T11:48:40+5:30

तिच्या हॉट अँड बोल्ड अदांवर मराठीसह साऊथची सिनेसृष्टीही आहे फिदा.

Bhagyashree mote share her new photo on social media | ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद!

ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद!

googlenewsNext

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्री नेहमीच तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

भाग्यश्रीने एक इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत भाग्यश्री बर्फ खेळताना दिसतेय. बर्फात खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी भाग्यश्री काश्मीर किंवा मनालीला गेलेली नाही तर मुंबईतल्याच एका ठिकाणी कृत्रिम बर्फाचा आनंद घेताना दिसली. भाग्यश्रीचा हा फोटो तिच्या फॅन्सानी ही आवडला आहे.  


भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.


भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

Web Title: Bhagyashree mote share her new photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.