फिल्मफेअर पुरस्कारातही सैराटने मारली बाजी... जाणून घ्या कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 05:46 AM2017-10-28T05:46:34+5:302017-10-28T11:16:34+5:30

फिल्मफेअर (मराठी चित्रपट) पुरस्कार नुकताच गाजावाजात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात देखील सैराट या चित्रपटानेच बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, ...

Best Actor in a Filmfare awards! | फिल्मफेअर पुरस्कारातही सैराटने मारली बाजी... जाणून घ्या कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

फिल्मफेअर पुरस्कारातही सैराटने मारली बाजी... जाणून घ्या कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

googlenewsNext
ल्मफेअर (मराठी चित्रपट) पुरस्कार नुकताच गाजावाजात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात देखील सैराट या चित्रपटानेच बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्री, दिग्दर्शन, संगीत, गीतकार, गायक, नवोदित अभिनेता, नवोदित अभिनेत्री, संवाद यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार सैराटला मिळाले तर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा लाइफटाइम अॅचिव्हमेंट पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्याचसोबत दीपिका पादुकोण, माधुरी दीक्षित, आदिती राव हैदरी या अभिनेत्रींनी देखील या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. दीपिका, माधुरी आणि आदिती यांनी रेड कार्पेटवर त्यांच्या सौंदर्याने चार चाँद लावले. माधुरीसोबत तिचे पती डॉ.श्रीराम नेने देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. 

deepika padukone madhuri dixit

फिल्मफेअर पुरस्काराची यादी पुढीलप्रमाणेः 
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सैराट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
नागराज मंजुळे (सैराट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
नाना पाटेकर (नटसम्राट)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
रिंकू राजगुरू (सैराट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
विक्रम गोखले (नटसम्राट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सई ताम्हणकर (फॅमिली कट्टा)

सर्वोत्कृष्ट संगीत
अजय-अतुल (सैराट)

सर्वोत्कृष्ट गीतकार
अजय-अतुल (सैराट)

सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष)
अजय गोगावले (येड लागलं - सैराट)

सर्वोत्कृष्ट गायिका (स्त्री)
चिन्मयी (सैराट झालं जी - सैराट) 

सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता
आकाश ठोसर (सैराट)

सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री
रिंकू राजगुरू (सैराट)

सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक
राजेश म्हापूसकर (व्हेंटिलेटर)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स)
महेश मांजरेकर (नटसम्राट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स)
मंगेश देसाई (एक अलबेला)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स)
वंदना गुप्ते (फॅमिली कट्टा)

लाइफ टाइम अॅचिव्हमेंट 
अशोक सराफ

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन
वासू पाटील (हाफ तिकीट)

सर्वोत्कृष्ट सिनेमेटॉग्राफी
संजय मेमाणे (हाफ तिकीट)

सर्वोत्कृष्ट कथा
राजेश म्हापूसकर (व्हेंटिलेटर)

सर्वोत्कृष्ट संवाद
भरत मंजुळे आणि नागराज मंजुळे (सैराट)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग
रामेश्वर भगत (व्हेंटिलेटर)

सर्वोत्कृष्ट बॅकराऊंट स्कोर
अजय-अतुल (सैराट)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी
राहुल ठोंबरे आणि संजीव होवलदार (ओ काका - वाय झेड)

सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन
संजय मौर्या आणि अॅलव्हिन रेगो (व्हेंटिलेटर) 

madhuri dixit Nana patekar

Ashok Saraf

Web Title: Best Actor in a Filmfare awards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.