‘बार्डो’.....तीन ध्येयवेड्यांची वेगळी कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:46 IST2016-03-10T08:46:07+5:302016-03-10T01:46:07+5:30

‘बार्डो’ हा सध्या सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनला आहे. ‘बार्डो’ मध्ये नेमके काय आहे? नेमके हेच जाणून घ्यायचे आहे, निषाद ...

'Bardo' ..... Three Objects Different Art | ‘बार्डो’.....तीन ध्येयवेड्यांची वेगळी कलाकृती

‘बार्डो’.....तीन ध्येयवेड्यांची वेगळी कलाकृती

ार्डो’ हा सध्या सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनला आहे. ‘बार्डो’ मध्ये नेमके काय आहे? नेमके हेच जाणून घ्यायचे आहे, निषाद चिमोटे, रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांच्या कडून. वैद्यकीय क्षेत्रातील भ्रूणतज्ञ असेलेले निषाद आणि संगीत क्षेत्रातील रोहन-रोहन या जोडीने ‘बार्डो’ या मराठीतल्या पहिल्याच चित्रपटात सायन्स फिक्शन चित्रपटाची निर्मिती केली आहे. 




जीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहचेपर्यंत, मधल्या प्रवासाची गंमत असते, ती गंमत म्हणजेच ‘बाडो’ हा चित्रपट. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच कलात्मक आनंद देईल, असा दृढ विश्वास तीघांना आहे. 

या चित्रपटात मकरंद देशपांडे आपल्याला नेहमी पेक्षा एक वेगळी भूमिका साकारताना पाहायला मिळतील. ‘बार्डो’ च्या निमित्ताने दिग्दर्शक भीमराव मुडे यांनीही आपल्या दिग्दर्शनातील कौशल्य पणाला लावून हा चित्रपट घडविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. मकरंद देशपांडे सोबतच अशोक समर्थ हे देखील या चित्रपटात एक आवाहनात्मक भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ते प्रेक्षकांच्या मनावर नक्क ीच कोरले जातील. 

photo : majja.ooo

Web Title: 'Bardo' ..... Three Objects Different Art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.