चिराग पाटीलच्या लग्नासाठी पैसे देण्यास बँकेचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 15:24 IST2016-11-22T15:21:55+5:302016-11-22T15:24:34+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिनेता चिराग पाटील हा वजनदार या चित्रपटातून झळकला आहे. हा चित्रपट आज ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत ...

Bank refuses to pay Chirag Patil's wedding | चिराग पाटीलच्या लग्नासाठी पैसे देण्यास बँकेचा नकार

चिराग पाटीलच्या लग्नासाठी पैसे देण्यास बँकेचा नकार

ही दिवसांपूर्वीच अभिनेता चिराग पाटील हा वजनदार या चित्रपटातून झळकला आहे. हा चित्रपट आज ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटात चिरागने सईच्या पतीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील चिराग आणि सईची हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तसेच चिरागने यापूर्वीदेखील सईसोबत अनेक चित्रपट केले आहेत. अशा या लाडक्या कलाकाराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चिराग हा एक डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही जरी आनंदाची बातमी असली तरी, चिराग सध्या कभी खूशी कभी गम परिस्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण चिरागच्या लग्नाला पाचशे आणि हजारच्या नोटांबंदीचा फटका बसलेला दिसत आहे. कारण त्याच्या लग्नासाठी बॅकेने पैसे देण्यास नकार दिला आहे. चिराग हा बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा मुलगा आहे. संदीप पाटील हे मुलाच्या लग्नासाठी पैसै काढण्यासाठी ते दादरच्या शिवाजी पार्कमधील एसबीआय ब्रांचमध्ये गेले होते. मात्र अद्याप त्यांना लग्नासाठी रक्कम मिळू शकली नाही. कारण संदीप यांना बँक संबंधित विविध कागदपत्रांची मागणी केली आहेत. त्याचप्रमाणे लग्नाची पत्रिकादेखील मागितली आहे. मात्र चिरागचे लग्न हे कोर्टमॅरेज असल्यामुळे त्यांना इतर आवश्यक कागदपत्र देण्यात येणार असल्याचे समजत आहे. चिरागने यापूर्वी बॉलिवुड व मराठी चित्रपटांतून आपला अभिनय दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्याचा वजनदार हा चित्रपटदेखील बॉक्सआॅफिसवर चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच तो एक नंबर या मालिकेतदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. 

Web Title: Bank refuses to pay Chirag Patil's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.