निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ सिनेमातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:19 IST2025-05-07T17:16:40+5:302025-05-07T17:19:19+5:30

‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

banjara marathi movie come on lets dance new song released starring bharat jadhav sunil barve and sharad ponkshe | निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ सिनेमातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ सिनेमातील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित

Banjara Movie : मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजातील या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर गुरू ठाकूर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गाण्यात तीन मित्रांचा सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमधील प्रवास पाहायला मिळत आहे. आयुष्यातील हे मौल्यवान क्षण जगताना ते दिसत आहेत. 

दरम्यान, या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, “ कमऑन लेट्स डान्स’ हे आयुष्यातील टेन्शन विसरून जगण्याचा मंत्र देणारे गाणे आहे. या गाण्यातील मित्रांसोबतचा मजेशीर प्रवास, त्यांच्यासोबतचे मजेशीर क्षण पाहाताना प्रेक्षकांनाही त्यांच्या मित्रांबरोबर लुटलेल्या आनंदाची आठवण होईल हे नक्की. तसेच एव्हरग्रीन सोनू निगम यांनी हे गाणे गायल्याने या गाण्याला अजूनच रंगत आली आहे.”

त्यानंतर पुढे शरद पोंक्षे म्हणाले, “ज्याप्रमाणे ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एका प्रवासाची आठवण करून देतो, तसेच हे गाणेही प्रेक्षकांच्या तरुणपणातील आठवणींना, मैत्रीला उजाळा देणारे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा करतो. तीन मित्रांचा हा रोमांचक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.”

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आहे. शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे. 

Web Title: banjara marathi movie come on lets dance new song released starring bharat jadhav sunil barve and sharad ponkshe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.