“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:01 PM2023-07-17T16:01:30+5:302023-07-17T16:02:15+5:30

‘बाईपण भारी देवा’ मधील अभिनेत्रीने शेअर केला अनुभव, म्हणाली, "बायका थिएटरमध्ये..."

baipan bhari deva fame actress shilpa navalkar shared movie success experience | “गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव

“गावात थिएटर नसल्याने बायका बैलगाडीतून...”, ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पाने सांगितला अनुभव

googlenewsNext

‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. महिलांबरोबरच पुरुष प्रेक्षकांच्याही हा चित्रपट पसंतीस उतरत आहे. सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहून कलाकारही भारावून गेले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ सिनेमाच्या भरघोस यशानंतर या चित्रपटाच्या टीमने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटात केतकीची भूमिका साकारलेल्या शिल्पा नवलकरने अनुभव शेअर केला. “या सिनेमाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असं वाटलं होतं का?” असा प्रश्न मुलाखतीत विचारला गेला. यावर उत्तर देताना शिल्पा म्हणाली, “चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडे तर उत्तमच आहेत. पण, त्यापेक्षा चित्रपट पाहिल्यानंतर येणारे मेसेज, व्हिडीओ...त्यात असं दिसतंय की चित्रपट पाहिल्यानंतर बायका उठून नाचायला लागतात.”

“ते वन नाइट स्टँड...”, ऋषी कपूर यांच्या लग्नानंतरच्या अफेअर्सबाबत नीतू कपूर यांनी केलेला खुलासा

“सिनेमा संपल्यानंतर त्यातील गाणं लावायला सांगून थिएटरमध्ये डान्स करत्यात. त्यादिवशी एका थिएटरच्या सुरक्षारक्षकाने ‘या चित्रपटाने आम्हाला भांडावून सोडलं आहे’ असं सांगितलं. थिएचरमध्ये चित्रपटाच्या पोस्टरबरोबर फोटो काढण्यासाठी बायकांनी गर्दी केली होती. जवळपास १५ हजार बायकांनी फोटो काढले होते. त्यामुळे तो सुरक्षारक्षक वैतागून गेला होता. काही बायका गावात थिएटर नसल्यामुळे बैलगाड्यांमधून दुसऱ्या गावात जाऊन बाईपण भारी देवा बघत आहेत. त्यामुळे हा सिनेमा राहिला नसून इतिहास झाला आहे, असं मला वाटतं. हे सगळं पचवण्याचा मी प्रयत्न करतेय,” असंही पुढे शिल्पा नवलकर म्हणाली.

“कॅन्सर झाल्याचं कळताच नानांनी मला आयपीएल बघायला नेलं अन्...”, अतुल परचुरेंनी सांगितली आठवण

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ बॉक्स ऑफिसवरही सुसाट आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुतित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: baipan bhari deva fame actress shilpa navalkar shared movie success experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.