Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 19:00 IST2021-11-21T19:00:00+5:302021-11-21T19:00:00+5:30

Jugnu: प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि उमेश रॅपर बादशाहच्या सुपरहिट ठरत असलेल्या जुगनू या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

badshah latest song Jugnu priya bapat and umesh kamat dance video viral | Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स

Video: नवरा-बायकोची कमाल जोडी; बादशाहच्या 'जुगनू'वर प्रिया-उमेशने केला भन्नाट डान्स

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत (umesh kamat) आणि प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर या दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं स्थान भक्कम केलं आहे. विशेष म्हणजे कलाविश्वाप्रमाणेच  हे दोघं सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. त्यामुळे अनेकदा ते एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच सध्या प्रियाने एक भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उमेशने तिची साथ दिल्याचं दिसून येत आहे.

प्रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि उमेश रॅपर बादशाहच्या (Badshah) सुपरहिट ठरत असलेल्या जुगनू (Jugnu) या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मूळ गाण्यात ज्या पद्धतीच्या डान्स स्टेप्स आहेत. अगदी तशाच डान्स स्टेप या दोघांनी फॉलो करायचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीत अभिनेत्री उर्मिला कोठारेनेदेखील या गाण्यावर ताल धरला होता. सध्या बादशाहचं 'जुगनू' हे  रॅप सॉन्ग तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे.
 

Web Title: badshah latest song Jugnu priya bapat and umesh kamat dance video viral