फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 13:30 IST2023-04-27T13:29:13+5:302023-04-27T13:30:46+5:30
Avinash narkar: अविनाश नारकर ज्या पद्धतीने योग करत आहेत ते पाहून चाहते कमालीचे आश्चर्यचकित झाले आहेत.

फिटनेसच्या बाबतीत अविनाश नारकरांपुढे ऐश्वर्या झाली फेल; पाहा अभिनेत्यांचं जबरदस्त योगासन
गेल्या काही काळापासून मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत सजग झाल्याचं दिसून येतं. त्यामुळेच अनेक कलाकार त्यांच्या वर्कआऊटचे किंवा डाएट प्लॅनचे व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर तर तिच्या फिटनेससाठी खासकरुन ओळखली जाते. एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. मात्र, त्यांचे पती, अभिनेता अविनाश नारकर यांच्या फिटनेसपुढे त्यादेखील फेल झाल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर अविनाश नारकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते योग करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ते ज्या पद्धतीने योग करत आहेत ते पाहून चाहते कमालीचे आश्चर्यचकित झाले आहेत. 'योगा म्हणजे वर्क आऊट नाही तर वर्क इन' असं कॅप्शन देत अविनाश नारकर यांनी योगासन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, अविनाश नारकर यांनी पहिल्यांदाच त्यांचा योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा त्यांचे डान्सचे, मजेशीर रिल्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत.