वैभवला डिरेक्ट करणार अवधुत गुप्ते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 15:30 IST2016-08-01T09:56:37+5:302016-08-01T15:30:15+5:30
प्रियांका लोंढे बाजीराव मस्तानी या चित्रपटातील चिमाजी अप्पा साकारणारा वैभव तत्ववादी या सिनेमानंतर ...

वैभवला डिरेक्ट करणार अवधुत गुप्ते
प्रियांका लोंढे
बाजीराव मस्तानी या चित्रपटातील चिमाजी अप्पा साकारणारा वैभव तत्ववादी या सिनेमानंतर एकदमच प्रकाशझोतात आला. मालिका अणि चित्रपटातील दमदार अभिनयामुळे वैभवने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी, कॉफी आणि बरच काही, चीटर या सिनेमांमध्ये वैभवचे नूकतेच दर्शन झाले. आता हा हॅन्डसम हंक काय करतोय याकडेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. वैभवच्या चाहत्यांसाठी आम्ही एक सुखद बातमी घेऊन आलो आहे. अवधुत गुप्ते यांच्या आगामी चित्रपटात वैभव आपल्याला एका विशेष भुमिकेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी वैभवने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला.
![]()
अवधुत गुप्ते यांच्यासोबतचा माझा हा पहिलाच चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अवधुत गुप्ते यांनी केले आहे. एका वेगळ््या विषयावर या सिनेमात प्रकाश टाकण्यात आला. प्रताप सरनाईक या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले असुन आम्ही लवकरच एका कार्यक्रमातून या सिनेमाचे कलाकार व प्रदर्शनाची तारीख सांगणार आहोत. तर चित्रपटाची प्रसिध्दी तुम्ही उशीरा का करीत आहात असे वैभवला विचारल्यावर तो म्हणाला हा चित्रपटच वेगळा आहे. प्रमोशनला जरी उशीरा सुरुवात केली तरी तो सर्वांपर्यंत नक्कीच पोहचणार आहे. आम्ही वेगळ््या प्रकारचे प्रमोशन टेक्निक यासाठी वापरणार असल्याचे त्यानी सांगितले. झेंडा, मोरया, एक तारा यासारखे चित्रपट केल्यानंतर आता अवधुत गुप्ते कोणत्या स्वरुपाची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत याची उत्सुकता लागली आहे.