अवधूत गुप्ते व श्रेयस जाधवचा दुबई रंगणार मराठी 'जल्लोष'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:30 IST2018-12-10T06:30:00+5:302018-12-10T06:30:00+5:30

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट "जल्लोष २०१८" याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे.

Avadhoot Gupte and Shreyas Jadhav will play in Dubai 'Jallolas' | अवधूत गुप्ते व श्रेयस जाधवचा दुबई रंगणार मराठी 'जल्लोष'

अवधूत गुप्ते व श्रेयस जाधवचा दुबई रंगणार मराठी 'जल्लोष'

ठळक मुद्दे दुबईमध्ये रंगणार "जल्लोष २०१८"


अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट "जल्लोष २०१८" याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या  कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्याचा समावेश असणार आहे. यासोबतच  गाण्यांना थोडा 'फ्युजन टच' देखील असणार आहे. या "जल्लोष २०१८" शो चे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक,संगीतकार, चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते आणि मराठी मधील पहिले रॅपर किंग जे.डी म्हणजेच श्रेयस जाधव. 

अवधूत गुप्ते त्याच्या गाण्यांसोबतच झेंडा, मोरया या सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी देखील ओळखला जातो. तर दुसरीकडे श्रेयस जाधव मराठीतील पहिला रॅपर सिंगर आहे. रॅपर म्हणून श्रेयसची अनेक गाजलेली गाणी आहेत. पण याशिवाय त्याची वेगळी ओळख म्हणजे त्याने मराठी चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. या दोन दिग्गज गायकांना एकाच स्टेज वर परफॉर्म करताना पाहण्याची अनोखी संधी दुबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. या सर्व गोष्टीमध्ये अजून एक सरप्राईझ पॅकेज म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी स्पृहा जोशी धमाकेदार सूत्रसंचालन करणार आहे. संगीताला भाषेचे बंधन नसते. म्हणूनच तर दुबईमध्ये होणाऱ्या मराठी मातीचा गंध असलेल्या या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे शोच्या तिकीट बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. येत्या २१ डिसेंबरला होणारा हा भव्य शो गणराज असोसिएट्स, मिराकी इव्हेंट्स आणि मोरया इव्हेंट्सच्या सहयोगाने सादर करणार आहे. मराठी ही भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून आता मराठी जागतिक स्तरावर ओळखली जाण्यामध्ये असे काही कॉन्सर्ट, मराठी चित्रपट यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. यंदाच्या २०१८ वर्षाचा शेवट दुबईकरांचा नक्कीच खास ठरणार आहे, यात शंका नाही. 

Web Title: Avadhoot Gupte and Shreyas Jadhav will play in Dubai 'Jallolas'