दमलेल्या बाबाची कहाणीला प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 14:01 IST2016-06-27T08:27:02+5:302016-06-27T14:01:35+5:30

               आजकाल जे अस्सल आहे ते प्रेक्षकांना जास्त भावतेय. खºया अन आपल्या रिअल ...

The audience's choice for the story of a tired father | दमलेल्या बाबाची कहाणीला प्रेक्षकांची पसंती

दमलेल्या बाबाची कहाणीला प्रेक्षकांची पसंती

 
r />             आजकाल जे अस्सल आहे ते प्रेक्षकांना जास्त भावतेय. खºया अन आपल्या रिअल लाईफशी जवळ जाणाºया कहाण्यांना प्रेक्षक पसंती दर्शविताना दिसत आहेत. सैराटचे उदहारण समोर असतानाच आता दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वडिल अन मुलीच्या भावनिक नात्याची गुंफण या चित्रपटात पहायला मिळतेच पण त्याही पलीकडे जाऊन समाजातील अन्याय-अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींच्या वास्तववादी सत्याचे देखील दर्शन या सिनेमात घडते. फक्त भावनिकतेमध्ये न अडकवून ठेवता चित्रपट समाजातील सत्यकथेवर प्रकाश टाकणारा असल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला आपलेसे केले आहे. संदिप खरे अन संस्कृती बालगुडे यांनी साकारलेल्या भुमिका तर अप्रतिमच आहेत. वडिल-मुलीचे नाते पडद्यावर तितक्याच ताकदीने दाखविण्यात हे दोघेही कुठेच कमी पडलेले दिसत नाहीत. दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणे जसे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन आहे. तसेच आता या चित्रपटाने देखील प्रेक्षकांना आपलेसे केलेय असे म्हणायला काही हरकत नाही. 

        

Web Title: The audience's choice for the story of a tired father