आशुतोष राणाने रेणुका शहाणेला कवितेच्या माध्यमातून केलं होतं प्रपोझ, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:04 IST2025-11-21T19:03:59+5:302025-11-21T19:04:44+5:30
Ashutosh Rana and Renuka Shahane : मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांनी २००१ मध्ये लग्न केलं. नुकतेच एका मुलाखतीत रेणुका शहाणेने राणाजींनी मला कविता ऐकवून प्रपोझ केल्याचं सांगितलं.

आशुतोष राणाने रेणुका शहाणेला कवितेच्या माध्यमातून केलं होतं प्रपोझ, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा
मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. ते दोघे ३ वर्ष एकमेकांना डेट करत होते. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणाने २००१ मध्ये लग्न केलं. नुकतेच एका मुलाखतीत रेणुका शहाणेने राणाजींनी मला कविता ऐकवून प्रपोझ केल्याचं सांगितलं.
रेणुका शहाणेला आशुतोष राणाने कवितेच्या माध्यमातून प्रपोझ केले होते आणि त्याचवेळी अभिनेत्रीने त्याच्या प्रपोझला उत्तर दिलं होतं. याबद्दल अभिनेत्रीने अभिजात मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''त्यांनी प्रपोझ करण्याच्या हेतूने कविता ऐकवली नव्हती. असंच म्हणजे एक हिंट होती. त्यांनी खडा मारला होता. मी ती पूर्ण प्रपोझल म्हणून घेतलं. दुसरी गोष्ट जी मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे तुला आश्चर्य वाटेल हे ऐकून की मला कविता अजिबात आवडत नाहीत. पण त्यांचं कवी मनच आहे आणि त्यांना कविता खूपच आवडतात.''
अभिनेत्याच्या प्रपोझला रेणुकाने दिलं असं उत्तर
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ''त्यांचं कवितांचं वाचन खूप आहे. तर त्यांनी मुद्दामून ती कविता ऐकवली. तीही त्यांच्या आवाजात. त्यांच्या आवाजात त्यांनी काहीही ऐकवलं तरी ते मला आवडतच. त्यामुळे त्यांनी ही कविता जेव्हा ऐकवली तेव्हा त्यांना माझ्या उत्तराची अपेक्षा नव्हती. पण त्या कवितेतून मी त्यांना उत्तर दिलं की इसका अर्थ है प्रेम. असं म्हटल्यानंतर मग ते एकदम एक असा पॉझ आला आणि मग ते म्हणाले, आप मुंबई आ जाइये और फिर बात करेंगे...''