अशोक सराफ यांच्यासाठी मुलगा अनिकेतनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:59 PM2024-02-07T12:59:58+5:302024-02-07T13:02:39+5:30

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Ashok Saraf Son Aniket Saraf shared a special post for his father After Receiving The Maharashtra Bhushan Award | अशोक सराफ यांच्यासाठी मुलगा अनिकेतनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाला...

अशोक सराफ यांच्यासाठी मुलगा अनिकेतनं शेअर केली खास पोस्ट, म्हणाला...

मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' जाहीर झाला. नायक, खलनायक, विनोदी, चरित्र अशा सर्वच भूमिका त्यांनी अगदी चोखपणे बजावल्या. अशोक सराफ यांना हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. वडिलांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफने खास पोस्ट केली आहे. 

अनिकेत सराफने  इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, 'माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जे काही मिळवले आहे. त्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला त्यांचा अभिमान वाटला आहे.  प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अतिशय अभिमानाने मी त्यांचं अभिनंदन करतो'. अनिकेतच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

अशोक सराफ यांचा अफाट चाहतावर्ग आहे. गेली चार दशके ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांची पत्नी निवेदिता सराफ यासुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आईवडील प्रसिद्ध कलाकार असल्याने त्यांचा मुलगासुद्धा याच क्षेत्रात करिअर करेल असं अनेकांना वाटत होतं. पण सर्वांनाच चकित करत अशोक सराफ यांच्या  एकुलत्या एका लेकाने वेगळ्याच क्षेत्रात करिअर केलं आहे.

अनिकेत हा कोणतंही अभिनेता नसून व्यवसायाने एक शेफ आहे. त्याला विविध पदार्थ बनवण्याची सुरुवातीपासूनच प्रचंड आवड होती. याच आवडीला त्याने आपलं करिअर बनवलं आहे. सध्या अनिकेतने एक प्रसिद्ध शेफ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तो भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवण्यात मास्टर आहे.  युट्युबवर 'निक सराफ' या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत.  अनिकेत सोशल मीडियावर सक्रीय असून वेगवेगळ्या पदार्थांचे फोटोज तो शेअर करत असतो.

Web Title: Ashok Saraf Son Aniket Saraf shared a special post for his father After Receiving The Maharashtra Bhushan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.