अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेतेय आर्या आंबेकर, पाहा तिचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 14:57 IST2019-08-07T14:55:40+5:302019-08-07T14:57:22+5:30

सध्या अनेक सेलिब्रिटी मंडळी कामासह घरी बसून पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर ...

Arya Ambekar Enjoying Holidays In America, See Her Exclusive Photos | अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेतेय आर्या आंबेकर, पाहा तिचे खास फोटो

अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेतेय आर्या आंबेकर, पाहा तिचे खास फोटो

सध्या अनेक सेलिब्रिटी मंडळी कामासह घरी बसून पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. आर्या सध्या अमेरिकेत असून तिथल्या अँडी ब्राऊन पार्कमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या पार्कमधील फोटो आर्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

 

“ज्या रिताने सूर्याची किरणं झाडांना ऊर्जा देतात त्यारितीने निसर्गाची शांतता तुमच्या शरीरात वाहू लागते. या जागेच्या प्रेमातच पडले आहे. सगळा ताणतणाव, चिंता यापासून खूप खूप दूर. शांत अशा या आपल्याच दुनियेत जगण्याची मजा काही औरच. या ठिकाणी आणखी काही वेळ घालवायला आवडलं असतं” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. 


या फोटोंवर आर्याच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावणारी मराठमोळी मुलगी म्हणजे आर्या आंबेकर. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिनं मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. 


गायनासह तिने तिने 'सध्या काय करते' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला  होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते. आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते. गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. 

Web Title: Arya Ambekar Enjoying Holidays In America, See Her Exclusive Photos