'मी केलेल्या प्रयत्नाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल...', अप्सरा सोनाली कुलकर्णी पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:20 IST2022-07-05T17:03:40+5:302022-07-16T11:20:41+5:30
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिने लिहिलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

'मी केलेल्या प्रयत्नाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल...', अप्सरा सोनाली कुलकर्णी पोस्ट चर्चेत
'तमाशा लाईव्ह' (Tamasha Live) चित्रपटातील गाण्यांना संगीतप्रेमी चांगलाच प्रतिसाद देताना दिसत आहेत. अलीकडेच सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni)चे 'कडक लक्ष्मी' हे गाणे सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या गाण्याला क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. विशेष बाब म्हणजे हे गाणे सोनाली कुलकर्णी हिनेच गायले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे. यात सोनाली कुलकर्णी आक्रमक स्वरूपात तिची व्यथा व्यक्त करत आहे. या गाण्याचे नाव 'कडक लक्ष्मी' असून नावाप्रमाणेच या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यासंदर्भात एक पोस्ट सोनालीने सोशल मीडियावर केली आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या 'तमाशा लाईव्ह' या सिनेमातील 'कडक लक्ष्मी' या गाण्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यूट्यूबवर या गाण्याला 1.9 मिलियन व्ह्युज मिळाल्याचं सोनालीने तिच्या पोस्टमधून सांगितलं आहे.
हे गाण्याच्या व्हिडीओ पोस्ट करत सोनाली लिहिते, मी केलेल्या पहिल्याच अश्या प्रयत्नाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. सोनालीच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, संगीतातून कथा सांगणारा ‘तमाशा लाईव्ह’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग सादर केला आहे. या गाण्यांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून संजय जाधव यांचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे.