या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, 'बाजीराव मस्तानी'मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 07:15 IST2019-11-08T07:15:00+5:302019-11-08T07:15:00+5:30

विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Anuja sathe is married with saurabh gokhale | या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, 'बाजीराव मस्तानी'मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

या मराठी हँडसम अभिनेत्याची पत्नी आहे अनुजा साठे, 'बाजीराव मस्तानी'मधून केलीय बॉलिवूडमध्ये एंट्री!

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.  अनुजा अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे.


अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच एक साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोतला तिचा फोटो फॅन्सना आवडला आहे.        


अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  

संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे.त्यानंतर ती  'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमातदेखील दिसली होती. या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत.  

Web Title: Anuja sathe is married with saurabh gokhale