अनुजा साठेने शेअर केलेला फोटो पाहुन तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:07 IST2020-04-27T17:02:11+5:302020-04-27T17:07:30+5:30

विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Anuja sathe looks hot on her instagram photo gda | अनुजा साठेने शेअर केलेला फोटो पाहुन तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा...

अनुजा साठेने शेअर केलेला फोटो पाहुन तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा...

मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्येही दाखवून दिली आहे. आपल्या अभिनय कौशल्याने मराठी कलाकारांनी बॉलिवूडच्या बड्या बड्या बॅनर्सना आणि दिग्दर्शकांवर मोहिनी घातली आहे. गेली वर्षानुवर्षे मराठी कलाकार आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत आहेत. विविध हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. 


अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोतला तिचा फोटो फॅन्सना आवडला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे.        


अनुजा नुकतीच एक थी बेगम नावाची या वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यात तिने अश्रफ भाटकर ऊर्फ सपनाची मुख्य भूमिका साकारली आहे. अशा असामान्य भूमिकेबद्दल अनुजा सांगते “आपण सहसा पुरुषांनी माफिया / डॉनवर साकारलेले चित्रपट आणि गोष्टी पाहिल्या आहेत. ही गोष्ट एका स्त्रीची आहे जी स्वतःच्या दुःखावर मात करून माफिया क्वीन बनते. यापूर्वी विविध प्रकारच्या भूमिका मी साकारल्या आहेत, पण अशी आवाहानात्मक भूमिका मला माझ्या हातून जाऊ द्यायची नव्हती.

Web Title: Anuja sathe looks hot on her instagram photo gda