Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 11:54 AM2023-12-11T11:54:34+5:302023-12-11T11:54:55+5:30

Anshuman vichare: अंशुमनने या रिक्षाचालकासोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

anshuman-vichare-shared-video-of-auto-driver-who-returned-his-phone | Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत

Video: रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; अंशुमन विचारेचा हरवलेला महागडा फोन केला परत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे (anshuman vichare). कलाविश्वात सक्रीय असलेला अंशुमन एक उत्तम कंटेन्ट क्रिएटर सुद्धा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा होत असते. यात बऱ्याचदा तो त्याच्या फनी व्हिडीओमुळे चर्चेत येत असतो. परंतु, यावेळी तो एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच अंशुमनला एका रिक्षावाल्याच्या चांगुलपणाचा अनुभव आला. हा अनुभव त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितला आहे.

काही दिवसांपूर्वी अंशुमनचा महागडा मोबाईल हरवला होता. परंतु, एका रिक्षावाल्याने अंशुमनसोबत संपर्क साधून त्याला तो परत केला. विशेष म्हणजे आजच्या काळात या रिक्षावाल्याने इतका महागडा फोन परत केल्यामुळे अंशुमनला त्याचं खूप अप्रूप वाटलं. त्यामुळेच त्याने अजूनही माणुसकी जिवंत आहे, असं म्हणत घडलेला प्रकार सांगितला.

नेमका काय घडला प्रकार?

काही दिवसांपूर्वीच अंशुमनचा मोबाईल हरवला होता. हा मोबाईल राकेश साळवी या रिक्षाचालकाला सापडला. मोबाईल मिळाल्यानंतर या रिक्षाचालकाने अंशुमनची पत्नी पल्लवी हिच्यासोबत संपर्क साधला आणि त्यांना मोबाईल परत केला. त्यामुळे रिक्षावाल्याचा प्रामाणिकपणा पाहून अंशुमन भारावून गेला. म्हणूनच, त्याने व्हिडीओ शेअर करत त्याचं कौतुक केलं. इतकंच नाहीतर, ‘अशी प्रामाणिक माणसं या जगात आहेत म्हणून माणुसकी अजूनही जिवंत आहे’ , असं कॅप्शनही त्याने या व्हिडीओला दिलं.

दरम्यान, अंशुमन मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, घरोघरी, कानामागून आली, या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर,  संघर्ष, भरत आला परत, मिसळ पाव, सूर राहू दे, शिनमा, परतू, पोश्टर बॉईज, वेड लावी जिवा या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
 

Web Title: anshuman-vichare-shared-video-of-auto-driver-who-returned-his-phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.