तैमुर नाही तर मराठमोळ्या रेणुकाचा सोशल मीडियावर धुराळा, तिच्या व्हिडिओना मिळतेय सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:54 IST2020-05-25T12:54:16+5:302020-05-25T12:54:45+5:30

या चिमुरडीचे व्हिडिओ पाहून कराल तिचे खूप कौतूक

another video Rahul Deshpande's daughter Renuka going viral take look TJL | तैमुर नाही तर मराठमोळ्या रेणुकाचा सोशल मीडियावर धुराळा, तिच्या व्हिडिओना मिळतेय सर्वाधिक पसंती

तैमुर नाही तर मराठमोळ्या रेणुकाचा सोशल मीडियावर धुराळा, तिच्या व्हिडिओना मिळतेय सर्वाधिक पसंती

बॉलिवूडमधील सेलिब्रेटी जितके फेमस आहेत, तितकेच त्यांची मुलं देखील प्रसिद्ध आहेत. तैमुर तर स्टार किडमधील सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला स्टार किड आहे. सोशल मीडियावर आपल्याला त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात आणि त्याचाही चांगलाच फॅन फॉलोविंग आहे. पण आता तैमुरपेक्षाही एका मराठी कलाकाराची मुलगी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सध्या तिचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची मुलगी सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तिचे नाव रेणूका आहे. तिचे विविध व्हिडिओ आपल्याला राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर पाहायला मिळतात. तिने नुकतेच रंग दो मोहे लाल... हे गाणं स्वतः गात त्यावर छान हावभावदेखील केले आहेत. तिच्या या व्हिडिओवर खूप कमेंट्स व लाइक्स येत आहेत. तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.


राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर सध्या रेणुकाचे एक ना अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. गायक राहुल देशपांडे देखील त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असून काही व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्या चिमुकलीला देखील पाहायला मिळत आहे. या चिमुकलीचा व्हिडिओंमधील अंदाज राहुल यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून तुमची मुलगी खूपच गोड असल्याचे लोक त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत.


राहुल यांच्या मुलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही व्हिडिओ तर लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत तर हजाराहून अधिक लोकांनी ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्यामुळे सध्या कोणत्याही स्टार किड पेक्षा राहुल देशपांडे यांच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

Web Title: another video Rahul Deshpande's daughter Renuka going viral take look TJL